Home कोल्हापूर जिल्हा टोप नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक तुषार सोनवणे ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या...

टोप नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक तुषार सोनवणे ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात…

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

टोप नगरभूमापन कार्यालयातील परिरकण भूमापक तुषार सोनवणे ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात…

 

शिरोली पुलाची,(प्रकाश कांबरे):- टोप (ता. हातकणंगले) नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक तुषार सोनवणे (वय ४५) (रा.सांगली) सध्या टोप सिटी सर्वे ऑफीस येथे सजा ठिकाण हे मंगळवार दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी नागाव येथील जमीनीची त्यांचा सहकारी अमर चौगुले यांच्यासह मोजणी करत होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख बापू साळुंखे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना चार हजार रुपयांचे लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक बापू साळुंखे यांचेकडून मिळालेली माहिती अशी की,अंबपवाडी ता.हातकणंगले येथील तक्रारदार यांनी टोप येथील भूमापन कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. यावेळी सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाच मागितली. दोघांच्या तडजोडीने ४ हजार रुपये देण्याचे ठरले,ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सांगितले होते तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले होते.मंगळवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावून सोनवणे याला ४ हजार रुपयाची लाच घेताना पकडले. यावेळी याच्यासोबत त्यांचा पंटर अमर चौगुले (रा.हातकणंगले) सोबत होते.
सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उपाधिक्षक बापू साळुंखे यांच्यासह सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे , सुनील मोरे, पोलीस हवालदार विकास माने, सुनील घोसाळकर सुधीर पाटील यांच्या पथकाने केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements