Home कोल्हापूर जिल्हा विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करा -सकल हिंदू समाज

विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करा -सकल हिंदू समाज

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करा -सकल हिंदू समाज

 

कोल्हापूर : येथील विशाळगडावर ज्या लोकांनी अतिक्रमण केले या सर्व लोकांवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत. कारण विशाळगड परिसरात १४ जुलै रोजी जे घडले त्या घटनेचे मुळ कारण हे गडावरील अतिक्रमण हेच आहे आणि प्रशासनाने हे मान्य सुध्दा केले आहे. तसेच न्यायालयानेही गडावरील बांधकाम हे अनाधिकृत आहे हे सांगीतले आहे म्हणून तर त्या बांधकामावर प्रशासनाने हातोडा चालवला आहे ना ? मग या लोकांवर गडावर अतिक्रमण केले अवैधरित्या मोठ्या प्रमाणात बांधकाम केली या कारणासाठी साठी प्रशासनाने गुन्हे का दाखल केले नाहीत?

Advertisements

 

जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर गडावर अतिक्रमण केलेल्या लोकांनवर गुन्हे दाखल करावेत नाही तर कोल्हापूर येथील सर्व हिंदुत्ववादी

संघटना प्रशासना विरोधात मोठे आंदोलन ऊभे करतील. आणि दुसरी

मागणी अशी की

 

बांगलादेशात हिंदू महिलावर आत्याचार सुरू आहेत, हिंदू मंदिरावर हल्ले करून देवाची विटंबना करून तोडफोड सुरू आहे, हिंदूचीं दुकान लुटली जात आहेत हिंदू नां प्रताडीत केले जात आहे या सगळ्या प्रकारात भारत सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदूना संरक्षण द्यावे . तसेच सरकार ने भारतात घुसखोरी केलेले बांगलादेशी लोकांना हुडकून तात्काळ बंगलादेशी परत पाठवावे.

 

जर बांगलादेश येथे हिंदूनवर हल्ले थांबले नाहीत तर याचे पडसाद भारतात दिसायला सुरुवात होईल तरी भारत सरकारने वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदूंना संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी. अशी मागणी सकल हिंदू समाज यांनी केली. यावेळी

हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर दिपक सुरेशराव देसाई (जिल्हा अध्यक्ष) गजानन तोडकर (शहर अध्यक्ष) शिवसेना कोल्हापूर उदय भोसले (उपजिल्हाप्रमुख) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर आशिष लोखंडे (शहर संयोजक) विश्व हिंदू परिषद कोल्हापूर कुंदन पाटील (जिल्हा अध्यक्ष) बजरंग दल कोल्हापूर अक्षय ओतारी (शहर संयोजक) हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर किरण धुसे (जिल्हा संघटक) अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर संदीप सासणे (जिल्हा अध्यक्ष) हिंदू महासभा कोल्हापूर मनोहर सोरोप (जिल्हा अध्यक्ष) सर्व हिंदुत्ववादी संघटना. जिल्हा महिला अध्यक्ष शोभाताई शेलार (सरनोबत) महिला जिल्हा उपाध्यक्ष शिला ताई माने व हजारो हिंदू शिवभक्त उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements