पाटण येथे एनएमएमएस विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    पाटण येथे एनएमएमएस विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा

     

     

     

     

    पाटण : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, पाटण(जि. सातारा) येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे एनएमएमएस NMMS विद्यार्थी – पालक – शिक्षक यांची सुविचार सभा बुधवारी (दि.७) ऑगस्ट रोजी संपन्न झाली. प्राचार्य दिलीपराव चरणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

    Advertisements

     

    विद्यालयाचे एनएमएमएस विभाग प्रमुख  संजय एस. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात एन एम एम एस वर्षभरातील नियोजन, कार्यवाही व अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. प्राचार्य दिलीपराव चरणे यांनी गतवर्षी एनएमएमएस सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यालय एन एम एम एस परीक्षेत अव्वल यश संपादन करून संस्थेच्या लौकिकात भर घालेल असा विश्वास व्यक्त केला.

     

    एनएमएमएस विभागाचे सहाय्यक  आर.सी. पाटील यांच्या कल्पकतेतून एन एम एम एस NMMS विभागाच्या यशाची उत्कृष्ट पीपीटी सादर केली. पालक प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, सौ सुनीता जाधव, विद्यालयाचे उपप्राचार्य श्री भागवत देसाई, पर्यवेक्षक सुनील शेवाळे, मार्गदर्शक शिक्षिका सौ.अन्नपूर्णा रावळ, सौ. सहारा भोंबल, एनसीसी अधिकारी श्री सतिश पाटील यांची भाषणे झाली.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements