सातवे हायस्कूल सातवे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    सातवे हायस्कूल सातवे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

     

     

    बच्चे सावर्डे (प्रतिनिधी सुनिल पाटील) सातवे हायस्कूल सातवे या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा (१९९०) च्या बॅचचा सुमारे ३५ वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

    Advertisements

    सातवे हायस्कूल सातवे मार्च १९९० साली म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा स्नेहमेळावा साजरा केला. आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेतला . यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते. जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला व शालेय अनुभव कथन केले.

    सर्व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

    जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, गप्पा मारल्या, आनंदी वातावरणात एकत्र जेवण केले. विशेषतः सर्वच मुलांना मुलींनी औक्षण करून आरती ओवाळून पूष्पवृष्टी करून स्वागत केल्याने सर्वच भारावून गेले आणी कार्यक्रमाला एक भावनीक स्वरुप प्राप्त झाले.

    मित्रत्वाची आठवण म्हणून वृक्षसंवर्धन सामाजिक बांधिलकी म्हणून पारीजातक व सोनचाफा वृक्षारोपण करण्यासाठी भेट देवुन समारोप करण्यात आला.हा स्नेहमेळावा पन्हाळा येथील राधानंद हॉटेल मध्ये संपन्न झाला.

    या कार्यक्रमास माजी विद्यार्थी रामदास निकम, शिवाजी पाटील,अरूण चौगुले,अजीत चौगुले,कृष्णात पाटील, महादेव कणसे, उत्तम नांगरे, श्रीरंग निकम,पोपट काटे,भरत काटे,बाबासो पाटील,दिनेश पाटील,विश्वास कोळी, उत्तम पाटील,दिपक भोसले, संभाजी वाळके,बाबासो वाळके, आनंदा बेटकर,सुरेश लठ्ठे, सुभाष निकम.सुनिता कणसे, अर्चना गाताडे, इंताज मुल्ला, सुरेखा लठ्ठे, संगीता परिट, बबिता घाटगे, विमल लोहार, भारती शेटे, स्वाती गुरव, जयश्री खाडे व सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements