बच्चे सावर्डे (जि.प.) विद्यामंदीर येथे मुख्याध्यापक पाटील सर यांचे हस्ते नवनियुक्त अध्यापिका मयुरी देवकर जाधव यांचा सन्मान
बच्चे सावर्डे, प्रतिनिधी(सुनिल पाटील ):-शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार व पवित्र पोर्टल मधून सरळ सेवा शिक्षक भरतीतून कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती पन्हाळा मधील जिल्हा परिषद विद्यामंदिर सावर्डे (सातवे) या ठिकाणी नव्याने नवनियुक्त झालेल्या अध्यापिका श्रीमती मयुरी रघुनाथ देवकर या हजर होतेवेळी विद्या मंदिर चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक जयसिंगराव पाटील सर व त्यांचे सहकारी सुरेश गोरड सर, बाबासाहेब रणसिंग सर व सयाजी पाटील सर, तसेच सौ कविता माळी मॅडम ,सौ शितल जगदाळे मॅडम ,सौ सुजाता बच्चे मॅडम या कर्तव्यदक्ष स्टाफने ज्येष्ठ नागरिक व वारणा न्यूज चॅनल चे संपादक सुनिल पाटील सर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मयुरी देवकर जाधव यांचे स्वागत व सन्मान केला व मुख्याध्यापक पाटील सर व रणसिंग सर यांनी सदर कार्यक्रमाच्या वेळी विद्या मंदिरातील सर्व समावेशक माहिती देऊन नवनियुक्त अध्यापिकेंला प्रोत्साहित अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. याच वेळी. स्वामी संस्थेचे प्राध्यापक अजित पवार सर तसेच आटपाडी पंचायत समितीचे रोजगार हमी विभागातील श्री विनायक जाधव उपस्थित होते. सत्काराला व सन्मानाला उत्तर देताना नवनियुक्त अध्यापिका मयुरी देवकर जाधव यांनी आपल्या मनोगतातून या विद्या मंदिरात मध्ये आल्यानंतर अतिशय आनंद झाल्याचे व बाकीची सर्व माहिती ऐकून माझ्या अध्यापनाच्या कामाला निश्चितपणाने वेग येईल व या शाळेच्या यशाच्या परंपरेला शोभेल अशा प्रकारचं ज्ञानदानाचं कार्य करण्याचा मी निश्चितपणे मनोदय व्यक्त करीत आहे आणि सदैव सावित्रीबाई फुले ,लक्ष्मीबाई पाटील यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझे कर्तव्य पार पाडीन अशा प्रकारची हमी दिली या श्री जोतिबा व श्री नागोबाच्या भूमीतील विद्यामंदिराच्या प्राणांगणात येताच मला मनस्वी आनंद झाल्याचे व इथला कर्तव्यदक्ष स्टाफ व बालचमुना पाहताच माझे मन प्रसन्न अशा प्रकारचे वाटले माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. शेवटी कविता माळी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.