जयसिंगपूर येथून ५० वर्षीय श्री अनिल रंगराव ओंडकर हे गृहस्थ हरवले
शिरोली पुलाची : कोल्हापूर / जयसिंगपूर येथून ५० वर्षीय गृहस्थ श्री.अनिल रंगराव ओंडकर हे ४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ७ वाजले पासून हरवले आहेत.मुळगांव यशवंत रेसिडेन्सी आर.के.नगर,यड्राव सुतगिरणी समोर इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील असुन यांची शरीरयष्टी मजबूत, चेहरा गोल व गोऱ्या रंगाचा असून, डाव्या हातावर यल्लम्मा देवी गोंदण असुन अंगात दगडी कलर लायनींग हाफ शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्याची उंची पाच फूट पाच इंच आहे. ते मराठी भाषा अस्पष्ट बोलतात. तरी हे कोठे गृहस्थ आढळल्यास जयसिंगपूर पोलिस ठाणे व सुप्रिया ओंडकर मोबाइल नंबर ८२६५०७७२९४ येथे संपर्क साधावा, तसेच शोधून देणाऱ्यास योग्य बक्षिस देवू असे आवाहन करण्यात आले आहे. सदर गृहस्थ हरवलेची रितसर तक्रार दि.५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ७ वा.५७ मि.जयसिंगपूर पोलिस ठाणे येथे मिसींग म्हणून ०२ / २०२३ अशी नोंद केली आहे.