Home Breaking News सीपीआरचे निवृत्त शल्याचिकीत्सक डॉ.एल.एस.पाटील यांचे निधन ; दोन महिन्यापूर्वी बंधूचे निधन झाल्याने...

सीपीआरचे निवृत्त शल्याचिकीत्सक डॉ.एल.एस.पाटील यांचे निधन ; दोन महिन्यापूर्वी बंधूचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

सीपीआरचे निवृत्त शल्याचिकीत्सक डॉ.एल.एस.पाटील यांचे निधन ; दोन महिन्यापूर्वी बंधूचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त

 

 

 

नवे पारगाव : कोल्हापूर सीपीआरचे निवृत्त शल्यचिकीत्सक डॉ. एल. एस. पाटील (वय६६ रा. चावरे ता. हातकणंगले) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त झाली.

Advertisements

डॉ.एल.एस.पाटील यांनी बांबवडे (ता. शाहुवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपल्या सेवेची सुरवात केली. त्यांनी गरजू, गरीब रुग्नाना सेवा दिली. पुढे त्यांची कोल्हापूर सीपीआर जनरल रुग्नालयात शल्यचिकीत्सक म्हणून त्यांनी सेवा केली.१८ एप्रिल २०२४ रोजी माजी ग्रामपंचायत सदस्य व पाटील यांचे बंधू काकासाहेब पाटील यांचे निधन झाले होते.

आज एल. एस. पाटील यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली व एका चांगल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला गाव मुकल्याच्या भावना व्यक्त झाल्या. त्यांच्यावर जुने चावरे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, दोघे बंधू, तीन बहिणी, पत्नी, दोन मुलगे, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.३०) रोजी चावरे येथे आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements