योगासनामुळे आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते- शरद जाधव
शाहुवाडी,(प्रतिनिधी): योगासनामुळे आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते असे प्रतिपादन योग प्रशिक्षक शरद जाधव यांनी केले ते श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित उदगिरी हायस्कूल उदगिरी या ठिकाणी योग प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील घाटगे होते. जाधव म्हणाले शरीरातील सर्व अवयव तंदुरुस्त ठेवायची असते. तर योगासने नियमित करावी तसेच योगामुळे बौद्धिक क्षमता वाढीस लागते. योगामुळे कौशल्य क्षमता वाढीस लागते आपले जीवन यशस्वी होते.
कार्यक्रमास संभाजी कांबळे,प्रदीप वाडेकर ,सुभाष राऊत, शरद जाधव ,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुभाष राऊत यांनी केले तर आभार संभाजी कांबळे यांनी मानले.