Home Breaking News कोडोलीत कडबा कुट्टी मशिनचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

कोडोलीत कडबा कुट्टी मशिनचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कोडोलीत कडबा कुट्टी मशिनचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

 

 

 

कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिंगे):- कोडोली (ता.पन्हाळा) येथील पाटील मळा येथील शेतकऱ्याचा चॉप कटरने कडबा कुट्टी करत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. संजय नामदेव कांईगडे वय ४५ असे त्याचे नाव असून या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय यांचे पाटील मळा परिसरात घर आहे. त्या घराला लागूनच जनावराचे शेड आहे. आज शनिवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान संजय जनावरांसाठी वैरणीचे चॉप कटरच्या साहाय्याने कडबा कुट्टी करत असताना त्यास विजेचा शॉक लागला शॉक लागताच तो ओरडून खाली पडला असता त्यांना नातेवाईकांनी तातडीने यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मोठा भाऊ असा परिवार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements