घबकवाडी : नवी मुंबई च्या ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण,

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    घबकवाडी : नवी मुंबई च्या ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण,

     

    ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ.निताताई खोत यांचा पूढाकार

    Advertisements

     

     

     

     

     

     

     

    सांगली :- घबकवाडी, (ता.वाळवा) येथील ग्रामस्थ व वृध्द महिला व पुरुष यांना विरंगुळ्यासाठी नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ. निताताई खोत यांच्या वतीने बसायची बाकडी देवून सदर बाकड्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

     

    ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. निताताई खोत यांचा यथोचित सन्मान व सत्कार घबकवाडी गांवच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना दिपकराव खोत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला.

     

    यावेळी बोलताना ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. निताताई खोत म्हणाल्या की, या आपल्या नवी मुंबई येथील ट्रस्ट च्या वतीने आज अखेर राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. एक हात मदतीचा या भुमिकेतुन अनेक गरजू विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रकारची शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. अनेक वृध्दाश्रम तसेच मुंबई येथील झोपडपट्टीत गरीबीचे जिवन जगत असलेल्या व निराधार, विधवा, परितक्ता महिलांना अन्नधान्य, चादर, रजई, बेडसिट, टावेल्स, निराधार व गरीब मुलांना कपड्यांचे वाटप करून आपण सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत.

     

    यावेळी घबकवाडी गांवचे माजी आदर्श सरपंच श्री. संजय कदम (बापू), सांगली अर्बन को ऑफ बँकेचे शाखा सल्लागार श्री. बजरंग कदम (आण्णा) यांनी मनोगत व्यक्त करून ट्रस्टच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच मा. संगीता माणिकराव घबक (वहिनी), ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. युवराज भारती, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनिल भारती, श्री. दिपकराव खोत, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सयाजीराव खोत, सावळा विठ्ठल मंदिर चे व्यावस्थापक ह. भ. प. सुभराव घबक, विनोद कदम (फौजी), प्रकाश कदम, भास्करराव कदम, विनायकराव कदम (बापू), दिलिपराव सांडगे, तन्मय खोत, हंबीरराव कदम, संतोष कदम, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, अशोकराव मुळीक, माणिकराव कदम, जालिंदर कदम, गुलाबराव कदम, गोविंद घबक यांच्या सह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    स्वागत व प्रास्ताविक युवक नेते श्री. अमित माणिकराव घबक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन अजित दत्तात्रय कदम यांनी केले. तर संयोजन अमोल कदम, सौरभ कदम, किरण कदम, सुजल कदम यांनी केले. शेवटी आभार अजित कदम यांनी मानले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements