हातकणगंले तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

    हातकणगंले तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

     

     

     

    कुंभोज,(प्रतिनिधी):- हातकणंगले तालुक्यात कुंभोजसह परिसरातील शेतकऱ्यांनी सध्या पेरणीला जोर दिला असून, सध्या शेतामध्ये सोयाबीन उडीद व भुईमुगाची पेरणी करत असल्याचे चित्र शेतकरी वर्गातून दिसत आहे.परिणामी हातकणंगले तालुक्यात पावसाने हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त होत असून. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावेळी पावसाने वेळेत हजरी लावल्याने शेतकरी सध्या अडसाली लागणी व पेरणीवर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी शेतकरी सध्या शेतीतील मशागतीत गुंतला आहे. परिणामी बियाणांची वाढलेले दर खताच्या वाढलेल्या किमती व शेतमशागतीसाठी लागणारे नांगरणी कोळपणी यांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडला असून उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कुंभोस्त परिसरात यावर्षी ऊस लागण्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, उसाबरोबर शेतकरी सध्या सोयाबीन व भुईमूग पिकाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. विनोद शिंगे कुंभोज