हातकणंगले तालुक्यात जनावरं चोरीचे प्रमाण वाढले

    हातकणंगले तालुक्यात जनावरं चोरीचे प्रमाण वाढले

     

    कुंभोज, (प्रतिनिधी):-हातकणंगले तालुक्यात कुंभोज लाटवडे भेंडवडे मिनचे सावडे परिसरात जनावरांच्या चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या दोन महिन्यात लाखो रुपयांची जनावरे चोरून नेऊन विक्री केल्याचे तक्रार हातकणंगले व वडगाव पोलिसात नोंद झाले आहे. परिणामी जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार याकडे शेतकरी वर्ग व पशुपालकांचे लक्ष केंद्रित झाले असल्याचे चित्र दिसत असून, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरल्याचेही दिसत आहे. परिणामी कुंभ सह परिसरात काही ठिकाणी चोरटे जनावरांच्या चोरीसाठी आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैदी झाली असून सदर सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत परिणामी पोलिसांच्या कडून सदर चोरट्यांचा बंदोबस्त होईल का नाही यावर मात्र शंका व्यक्त केली जात असून सदर चोरीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे. विनोद शिंगे कुंभोज