वीट भट्टी मजुराच्या घरातील विवाहीतेसह चार मुली गायब
पेठ वडगाव, (प्रतिनिधी) : मिणचे (ता.हातकणंगले) येथील वसंत जाधव यांच्या वीटभट्टी वरील मजुराच्या घरातील एक विवाहीत महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह तीन अल्पवयीन मुली अचानक गायब Missing झाल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले रोडवर मिणचे हद्दीत वसंत शंकर जाधव यांची वीट भट्टी आहे. राकेश सावकार जाधव (वय 26) मुळ गाव निगडेवाडी,पोवार मळा उचगाव ता.करवीर येथील असून ते आपल्या कुटुंबासह जाधव यांच्या वीट विटभट्टीवर काम करीत आहेत.गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान राकेश यांची पत्नी काजल राकेश जाधव (वय 25) या आपल्या दो वर्षीची मुलगी नायरा जाधव हिला घेऊन शेजारील असणाऱ्या मीना पवार यांच्या घरी जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर गेल्या आणि सोबत नवऱ्याच्या चुलत भावाच्या तीन मुली यामध्ये कु.नेहा लक्ष्मण जाधव-गोसावी (वय 15),कु. अर्पिता लक्ष्मण जाधव-गोसावी (वय 14),कु.शितल दिलीप जाधव-गोसावी(वय 16)यांना घेऊन गेल्या.त्या सर्वजन परत रात्री उशिरापर्यंत आल्याच नाहीत. राकेश जाधव यांनी परिसरात चौकशी केली परंतु काहीच ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी रात्री उशिरा वडगाव पोलीस ठाण्यात वर्दी दिली.
एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याने वडगाव व परिसर हादरून गेला आहे. सदर घटणेची नोंद वडगाव पोलीसात झाली असून अधिक तसपा सपोनि पाटील करीत आहेत.