हातकणंगलेत डंपरची धडक, महिला ठार

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    हातकणंगलेत डंपरची धडक, महिला ठार

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिंगे):- भरधाव वेगाने निघालेला डंपर आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातांत गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल वरील महिलेचा उपचारांला नेत असतानाच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत . पूजा सुरेश पाटील , (वय वर्ष -३२ रा. तारदाळ , ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव असून अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यांत झाली आहे . पोलिसांनी डंपर चालक विकास पारसे (रा. इचलकरंजी) याला डंपरसह ताब्यात घेतले आहे .

    Advertisements

    तारदाळ येथील सुरेश पाटील हे आपल्या मोटारसायकल ( क्र .एमएच ०९ एम १०९५) ने कुलदैवत धुळोबा देवालयाकडे निघाले होते. हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यानजीकच्या ओढ्याजवळ आले असताना मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ( क्र एमएच ०९ ईएम ७३४७ ) त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दांपत्य व मुलगा आर्यन आणि भाचा विराज है रस्त्यांवर जोरात आपटले. यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले. सुरेश यांच्या पत्नी पूजा यांच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पाटील कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती तर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

    घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे आपल्या चार चाकी वाहनातून नेत असतानाच ॲम्ब्युलन्स वाटेत येताच जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारापूर्वीच पुजा हिचा मृत्यू झाल्याने पाटील कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.

    हातकणंगले, तारदाळ, खोतवाडी रोडवर भरधाव मुरूमाने भरलेले डंपर प्रचंड वेगाने धावत असतात. अनेकवेळा या परिसरात अपघात झाले आहेत. तरीही डंपर चालक मुरूमाच्या नावाखाली सुसाट धावत असतात. त्यांच्यावर प्रशासन आणि पोलिसांचा अंकूश नसल्याने अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागला आहे. पण तरीही डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक, प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. याची दखल गांभीर्याने पोलिस खात्याने घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

    🔲–

    घटनास्थळाला लागूनच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळ भाज्यांचे व अन्य विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले असतात . त्यामुळे वाहतूकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो . त्यामुळे अशा विक्रेत्यांनाही वेळीच पायबंद घालण्याची मागणी होत आहे .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements