आई तुझ्या सन्मानास “मदर्स डे” पुरेसा नाही….

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    आई तुझ्या सन्मानास “मदर्स डे”  mother’s day पुरेसा नाही….

     

     

     

    आई तुझ्या सन्मानास

    Advertisements

    “मदर्स डे” पुरेसा नाही

    अर्पिले हे आयुष्य जरी

    अपुरे आहे तुझिया पायी!

     

    मायेच्या त्या पदराखाली

    मातृत्वाची ऊब लपलेली

    कष्टाला तुझ्या नसे सीमा

    पोरांसाठी राबत असलेली

    जन्मोजन्मी पूजिले तरी

    तुझे उपकार फिटणार नाही

    आई तुझ्या सन्मानास

    “मदर्स दे” पुरेसा नाही!

     

    तुझ्याच पोटी यावे वाटते

    पुढच्याही जन्मोजन्मी

    फेडावे ऋण या जन्मीचे

    पुढच्या तरी मी जन्मी

    ईश्वरा ही हाक माझी

    सांग ऐकशील की नाही

    आई तुझ्या सन्मानास

    “मदर्स डे” पुरेसा नाही!

     

    कवी:- विजयानंद सोनटक्के, इचलकरंजी (९०९६१८५३४९)

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements