उंड्री उपकेंद्रामधे जागतिक महिला दिन साजरा

     

    घुणकी : उंड्री ता पन्हाळा येथे महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील महिलांचा सन्मान आज प्रत्येक क्षत्रामधे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला समाजामधे काम करीत आहेत.घरची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून विविध क्षेत्रामधे महिलांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आहे.
    जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उंड्री ता.पन्हाळा येथील उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी या उपकेंद्रामधे कार्यरत असणार्या परिचारिका,आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा सन्मान केला.
    कोरोना महामारीमधे उंड्री उपकेंद्रामधील परिचारिका,आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खूप चांगल्याप्रकारे गावातील रुग्णांची माहिती गोळा करुन आरोग्य विभागाला खूपच महत्त्वाची मदत केली होती.शिवाय उपकेंद्राच्या दैनंदिन कामामधे त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.या सर्वांचं गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी सांगितलं.
    या कार्यक्रमास परिचारिका कविता भोसले,कविता पाटील,आशा स्वयंसेविका सुनिता कालेकर,संगीता सुतार,अंगणवाडी सेविका अरुणा यादव,रेखा चव्हाण,सुजाता गवळी,भारती कांबळे,नंदाताई पाटील,मदतनीस रंजना कांबळे,सखुताई जाधव,कल्याणी जाधव,शौर्य जाधव आदी उपस्थित होते .