गिरीजा हाँस्पिटलमध्ये कोराना लसीकरण केंद्राचे उदघाटन

     

    पेठ वडगांव: शहरातील गिरीजा हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले व जनआरोग्य योजनेतून खाजगी स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आजपासून सुरू झाले. यावेळी जेष्ठ नागरिक श्री.जयप्रकाश क्षिरसागर व इंजिनियर रायसिंग भोसले , आनंदराव गांजवे
    यांना पहिली लस देवून मोहिमेला सुरुवात झाली. कोरोनाची लस आरोग्य केंद्रात देखील उपलब्ध आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी खाजगी दवाखान्यात व इतरांनी सरकारी दवाखान्यात कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन मा.उपनगराध्यक्ष डाँ. अशोक चौगुले व डाँ. राकेश अशोक पाटील यांनी केले.
    यावेळी वडगांव शहरातील दहा जेष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली.
    या प्रसंगी पत्रकार,विवेक दिंडे
    ,सुहास जाधव ,सचिन पाटील, मोहन शिंदे ,रमेश बोभाटे, प्रविण जाधव , मा,नगरसेविका स्नेहल भोसले , सुनिल लाड , जगन्नाथ माने , बंडा गोंदकर , विवेक गुरव इत्यादी उपस्थित होते.