पंचतारांकित MIDC साठी उमदी येथे आमदार पडळकर व अधिकारी यांनी केली पाहणी
जत,(प्रतिनिधी):- जत तालुक्यात MIDC व्हावी यासाठी बरेच दिवस झाले तालुक्यातून शासन, प्रशासन यांना बरेच वेळा निवेदन देण्यात आले परंतु MIDC चा प्रश्न मार्गी लागेल याचे फक्त आश्वासन असायचे परंतु MIDC उभारली गेली पाहिजे या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील उमदी येथे पंचतारांकित MIDC साठी संबंधित अधिकारी यांच्या समवेत त्या जागेची पाहणी केली आहे उमदी सारख्या ठिकाणी MIDC झाल्यानंतर व्यापार व उद्योगासाठी फायदातर होइलच तरुणांना देखील हाताला काम मिळेल त्या बरोबर तालुक्यातील आर्थिक उलाढाल देखील वाढणार असल्याचे आमदार पडळकर म्हणाले यावेळी पहाणी करताना आमदार गोपीचंद पडळकर,संजय तेली,लक्ष्मण जखगोंड,भाऊसो दुधाळ व प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.