Home कोल्हापूर जिल्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

 

 

 

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर त्यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली. तसेच त्याठिकाणी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते