तालीम संघ गजानन मंडळाच्यावतीने दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार

    तालीम संघ गजानन मंडळाच्यावतीने दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार

     

     

    खोची,(भक्ती गायकवाड):-खोची ता.हातकणंगले येथील तालीम संघ गजानन मंडळाच्यावतीने इयत्ता बारावी व दहावी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मंडळाच्या युवा सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एस.बी.जाखले होते.

    यावेळी बारावी मध्ये ८५ टक्के गुण संपादन केलेल्या सौरभ सुनील शिंगे,८२ टक्के गुण संपादन केलेल्या स्वराली लक्ष्मण गुरव, ७१ टक्के गुण मिळवलेल्या अस्मिता अनिल जाखले, तर दहावी मध्ये हर्षद भरत गुरव ( ८९ टक्के) जान्हवी नंदकुमार जाखले (८५ टक्के),शिवतेज संजय जाखले (७५ टक्के) ,जिया निजाम पटवेगार (७४ टक्के) अथर्व आनंद जाधव (७१ टक्के) ,पार्थ मारुती खांडेकर (५७ टक्के) यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

    यावेळी बोलताना एस.बी.जाखले यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या शिक्षणासाठी आई-वडील घेत असलेली कष्ट व आपणाला आयुष्यात उंच भरारी घेवून काहीतरी मोठे होण्याचे स्वप्न बाळगून अभ्यासात नेहमी लक्ष द्यावे,असे सांगून अन्य विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा. असे आवाहन केले.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक नंदकुमार जाखले यांनी केले.तर आभार भानुदास गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमास गणपती जाखले, राजकुमार गुरव,विलास जाखले,कुमार जाधव,शामराव जाखले,पोपट घोडके,सुनिल शिंगे,डॉ.सोनाजी जाधव,मारुती खांडेकर,अनिल शिंगे,भरत गुरव,योगेश जाधव,उध्दव पुनाळे,सचिन जाधव,प्रमोद गुरव, धनाजी चव्हाण,संतोष साजरे आदीसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अवधूत घोडके,विराज जाधव,रोहन जाधव,शरद जाखले,प्रसाद शिंगे,निखिल घोडके,विजय जाखले,नितीन जाधव,शिवतेज शिंगे,शंतनू गुरव,पृथ्वीराज गायकवाड,राजकुमार घोडके,शिवम शिंगे,अक्षय पुनाळे, संतोष घोडके,अक्षय जाधव,सार्थक उपाध्ये,संजय पुनाळे,सागर गायकवाड,श्रेयश शेळके,ओम शिंगे, सत्यजित कागवाडे,प्रथमेश जाधव,वरुण वगरे,नाना पोवार यांनी केले.यावेळी मंडळातील सर्व सदस्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.