Home कोल्हापूर जिल्हा वडगावात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वडगावात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 

हनमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप करतांना आमदार जयंत आसगावकर, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ व उपस्थित मान्यवर

 

 

 

वडगावात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Advertisements

 

पेठ वडगाव : यथील रौप्यमहोत्सवी हनुमान तरूण मंडळा मार्फत प्रतिवर्षी साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी हनुमान भक्तांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती.

मंदीरास आकर्षक फुलांनी व विद्यूत रोषणाई ने सजविले होते. शुक्रवारी रात्री भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शनिवारी पाहटे पाच वाजता पुजारी उदय गुरव,दिपक गुरव ,संजय जंगम यांनी पुजा व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला. सुर्योदयावेळी उपस्थित महीलांनी हनुमान जन्मकाळ व पाळणा सादर केला.
सकाळी 9 वा आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीचे पुजन व आरती माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी,पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केली.
त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
उन्हाचा तडाखा जास्त असल्याने महाप्रसादाचे वाटप सायंकाळी करण्यात आले यावेळी
महाप्रसादाचे वाटप आमदार जयंत आसगावकर ,माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यादव आघाडी चे माजी नगरसेवक, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, हनुमान मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शविली असून सुमारे 5000 भाविकांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements