नवे पारगावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची २५०० स्क्वेअर फुटांची रागोळी
पेठ वडगाव , ता.१३ : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने व रमाई महिला मंडळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर युथ ब्रिगेड यांच्या सहयोगातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची २५०० स्क्वेअर फुटांची रांगोळी नवे पारगांव येथे साकारण्याचे काम सुरु असून आज रात्री खुली होणार आहे.
नवे पारगांव येथील रमाई बौध्द विहार मंदिर परीसरात गेल्या चार दिवसापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती ६०x ४० स्क्वेअर फूटमध्ये प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली जात आहे. कलाकार आशा संदिप चव्हाण यांच्यासह पन्नासहून अधिक रमाई महिला मंडळाच्या मुलीसह महिलांनी रांगोळी रेखाटण्याचे काम सुरु असल्याची माहिती स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांनी दिली.
रांगोळी साकारण्याचे काम आज रात्री पूर्ण होणार असून आज रविवारी मध्यरात्री पाहण्यासाठी खुली होणार आहे. १६ एप्रिल सायंकाळपर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
१४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येणार आहे. १६ एप्रिलला सायंकाळी सात वाजता रमाई बौध्द विहार मंदिरच्या प्रांगणात फुले, शाहू, आंबेडकर समाजपरिवर्तन विषयी
पी. एस. चोपडे, डाॅ. प्रशांत गायकवाड, वैभव कांबळे यांची व्याख्याने होणार आहेत.