Home कोल्हापूर जिल्हा हेरले येथे हनुमान जंयती भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

हेरले येथे हनुमान जंयती भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 

हेरले येथे हनुमान जंयती भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

 

 

हेरले / (प्रतिनिधी ):- हेरले ( ता हातकणंगले) येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी हनुमान भक्तांची दर्शनास मंदिर परिसरात गर्दी झाली होती.
शुक्रवार रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव व बंडू गुरव यांनी पूजा, मंत्रपठन, पुष्पाजंली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला. सकाळी हनुमान जन्मोत्सोव सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये हनुमतांची मुर्ती व गदेची पूजा करून सवाद्य श्री हनुमान मंदिररास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
‘श्री रामभक्त हनुमान की जय’ या जयघोषात ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थित पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रांगेन जाऊन भक्तांनी दर्शन घेतले.
या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, नंदकुमार माने, विजय कारंडे, माजी उपसरपंच विजय भोसले, पांडुरंग शिंदे, संतोष भोसले, मंदार गडकरी,अशोक मुंडे,भरत मिरजे, पांडुरंग डांगे, धनाजी कारंडे, विजय पाटील, सुनील कारंडे, शरद माने, रवी मिरजे आदी मान्यवरांसह भक्तगण उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements