विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता
ठाणे, (मुंबई) :- स्वतःच्या घरापासून जबरदस्त पळवून नेऊन झोपडपट्टीच्या एरियामध्येच बलात्कार केल्याचा आरोप 21 वर्षाच्या पुरुषावर 26 वर्षाच्या महिलेने केला होता. कुरार पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल गुन्हा नोंद झाल्यावर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. गरिबीच्या कारणामुळे वकील लावू शकला नाही म्हणून गेल्या 16 महिन्यापासून आरोपी जेलमध्येच होता.
जेलमध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांना तो भेटला व कायदेशीर मदत मागितली. दर्द से हमदर्द संस्थेतर्फे एडवोकेट स्वप्निल कदम यांची नियुक्ती करण्यात आली, तर पॅरा लीगल वॉलेंटियर म्हणून वेदिका दळवी यांनी काम पाहिले.
11 ते 12 तासांनी आरोपींनी महिलेला घरी सोडले असा आरोप होता परंतु एड.कदम यांनी सत्र न्यायाधीश श्री. मोरे यांच्यासमोर असे सांगितले केले की, दिवसा ढवळा घटना घडलेली दिसत आहे तरीही कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. महिलेने कोणतीही आरडा ओरड केलेली नाही, तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाही त्यामुळे खोटी केस केल्याची शक्यता आहे. त्यांचे म्हणणे ऐकून कोर्टाने काही अटी आणि शर्ती देऊन जामीन मंजूर केला, आरोपीने साक्षीदाराला धमका होऊ नये पुराव्याशी छेडछाड करून व कोर्टात नियमित हजर राहावे असे कोर्टाने निर्देश घालून दिले.
खऱ्या केस मधील आरोपी सुटू नये तसेच खोट्या केस मध्ये विनाकारण कोणीही अडकला जाऊ नये यासाठी संस्था विनामूल्य कायदेशीर मदत देण्याचे काम करते असे संस्थेचे दिंडोशी कोर्ट प्रमुख एड. नितीन हजारे यांनी सांगितले.