Home कोल्हापूर जिल्हा निर्बिजीकरणात सातत्य ठेवणार,गळतीचे काम तात्काळ सुरू करणार -अति.आयुक्त सुषमा शिंदे यांचे इनामला...

निर्बिजीकरणात सातत्य ठेवणार,गळतीचे काम तात्काळ सुरू करणार -अति.आयुक्त सुषमा शिंदे यांचे इनामला आश्वासन

निर्बिजीकरणात सातत्य ठेवणार,गळतीचे काम तात्काळ सुरू करणार -अति.आयुक्त सुषमा शिंदे यांचे इनामला आश्वासन

 

इचलकरंजी,(प्रतिनिधी):- इचलकरंजी शहरात व कृष्णा योजनेस वारंवार लागत असलेल्या पाणी गळती बाबत तात्काळ उपाययोजना करून शहराअंतर्गत गळतीचे काम लगेच सुरू करण्यात येणार आहे,त्याचबरोबर कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेत सातत्य ठेवण्याची आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी इचलकरंजी नागरिक मंचला दिले शहरातील विविध प्रलंबित प्रश्नाबाबत आज इचलकरंजी नागरिक मंचने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेस वारंवार लागणारी गळती,तसेच शहरांतंर्गत पाण्याची गळती यामुळे पाणीपुरवठा गेल्या २० दिवसापासून विस्कळीत झालेला आहे,६-७-८ दिवसाआड पाणी सुटत आहे.त्याचबरोबर शहरांतर्गत शिवाजी मार्केट,थोरात चौक टारे कॉर्नर येथील लागलेल्या गळतीने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे त्याचे तातडीने नियोजन करावे वारंवार लागणारी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली.त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची संख्या शहरांमध्ये पुन्हा वाढत असून निर्बिजीकरणाचे टेंडर मध्ये गॅप पडत असल्यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नाही यावर बोलताना टेंडर मध्ये सातत्य ठेवण्यात येईल तसेच चिकन सिक्स्टी फाईव्ह चे व खाद्यपदार्थ गाडे यांना वेस्टेज रस्त्यावर न टाकण्याबाबत कडक सूचना देण्यात येतील.कृष्णा योजनेच्या पाईपलाईन बदलण्याचा कामाचे नियोजन केले असून किमान ६ महिने त्यासाठी लागतील त्यानंतर गळतीचे प्रमाण कमी होणार असल्याचेही बाजी कांळे यांनी सांगितले.शहरांतर्गत असणारे गळती काढण्याचे काम तातडीने हाती घेऊन येत्या आठवड्यामध्ये २ दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले. दीपावली बाजाराच्या रस्त्यावर भरल्याने दहा दिवस राज्य महामार्ग बंद राहिला,अतिक्रमण निर्मूलन पथकास मनुष्यबळ न पुरवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.शहर अतिक्रमण मुक्त करण्यात यावे तसेच स्टेशन रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू असणाऱ्या कामात इचलकरंजी महापालिकेने पॅचवर्क केलेले आहे त्यामुळे संबंधित कामाचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असणाऱ्या कामातून कमी करावे तसेच इचलकरंजी शहर तातडीने अतिक्रमण मुक्त करण्यात यावे याबाबतही मागणी करण्यात आली.चर्चेत आरोग्य विभागाचे महादेव मिसाळ,नगरअभियंता महेंद्र क्षीरसागर, अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष आवळे,पाणीपुरवठा विभागाचे बाजीराव कांबळे यांच्यासह उमेश पाटील,राम आडकी,अमृत पारख,शितल मगदूम,महेंद्र जाधव,राजेंद्र मुठाणे,दीपक पंडित,अमित बियाणी अभिजित पटवा उपस्थित होते.