डॉ.डी.वाय.पाटील कृषि पदविका संघाचे खो खो स्पर्धेत यश
तळसंदे, (जि.कोल्हापूर): डॉ.डी.वाय.पाटील कृषी पदविकेच्या खो खो – मुले या संघाने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच डॉ.डी.वाय.पाटील कृषी पदविकेच्या ११ खेळाडूंची राहुरी येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .या स्पर्धेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत राजर्षी शाहू कृषी तंत्र विद्यालय ,कसबा बावडा,कोल्हापूर येथे करण्यात आले होते. प्राचार्य पी.एस.पाटील, रजिस्ट्रार आर.पी.शिंदे, प्रशिक्षक एस.एस.कदम, एस.ए.कांबळे, एस.व्ही.शिंदे,व व्ही.एस.कोंडविलकर यांनी संघाला मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील ,विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या .