एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड व्हावी यासाठी पायी दिंडी काढून जोतिबाला साकडे
वाळवा, (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड व्हावी यासाठी आष्टा ते जोतिबा पायी दिंडी काढून प्रणाली ताई लोंढे यांचेसह सेनेच्या पदाधिकारी यांनी जोतिबा देवाला साकडे घालण्यात आले.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने दादा तसेच सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार बापू, वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाळवा तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, वाळवा तालुका महिला आघाडीच्या प्रमुख प्रणाली ताई लोंढे, कोल्हापूर जिल्ह्याचे किनी येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख सनी समुद्रे, तसेच सरस्वती कुरणे, शीतल कुरणे दीपिका कुरणे समृद्धी कुरणे, ईश्वरी कुरणे तसेच आष्टा आणि परिसरातील महिला या महिलांनी आष्टा ते ज्योतिबा देव या ठिकाणी राज्याचे नवीन आलेले सरकार या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची फेरनिवड मुख्यमंत्री म्हणून व्हावी यासाठी पायी दिंडी काढून जोतिबा देवास साकडे घालण्यात आले.