आमदार डॉ.अशोकराव माने यांची चावरे येथे आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):-चावरे (ता. हातकणंगले) येथे काविळ साथ आल्याने नूतन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी चावरे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या. यासाठी लागेल ती मदत करु, अशी ग्वाहीही माने यांनी यावेळी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. सतीश सुर्यवशी, आरोग्य निरीक्षक कृष्णात मोहिते, जिल्हा साथ, रोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, तालुका वैद्यकिय अधिकारी पी. एस. दातार, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे पंकज काळे, सरपंच उदयसिंह पाटील आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. माने यांनी नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत. साथीचे आजार पासरण्याआधी नागरिकांनी ते होऊ नये, याची काळजी घ्यावी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काविळ साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.