Home कोल्हापूर जिल्हा पेठ वडगांव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

पेठ वडगांव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

पेठ वडगांव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

 

 

 

 

पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंबप, पाडळी,अंबपवाडी, मनपाडळे, वाठार तर्फे वडगाव तसेच तळसंदे गाव परिसरातील शेतकरी बंधूंना महावितरण कडून होणारे अन्यायी भार नियम रद्द करावे तसेच शेतकरी बंधूंच्या शेती पंपासाठी लागणारी वीज वेळेत मिळावी या मागणीसाठी पेठ वडगाव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

 

शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,भार नियम रद्द झालेच पाहिजे,शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो..अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला तसेच महावितरणचे वडगाव येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सदरचे कार्यालयाचे काम दोन तास बंद पाडले.

 

या उग्र आंदोलनाची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भार नियम रद्द करत असल्याबाबतचे लेखी पत्र दिले त्यानंतरच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

यावेळी शिवसैनिक संदीप दबडे,उदयसिंह शिंदे,सागर चोपडे, वडगांव उपशहर प्रमुख सुनील माने,अंकुश माने, मंडपाडळे गावचे सरपंच रायबा शिंदे, कृती समितीचे संजय सूर्यवंशी,दीपक सूर्यवंशी, प्रतीक कानडे,आबाजी वाघमोडे, अंबप शाखाप्रमुख लालासो माने, पाडळी शाखाप्रमुख शिवाजी ठाणेकर, जालिंदर जाधव,दीपक सूर्यवंशी, अरुण सूर्यवंशी, राजू पठाण,शिवराम कानडे, भरत खोत तसेच शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.