महिराज जमादार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
हातकणंगले,(प्रतिनिधी):-शाळांमधील उल्लेखनीय नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यासाठी डॉ.सुजित मिणचेकर फाउंडेशनच्या वतिने आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती महिराज अकबर जमादार यांना माजी.मंञी भास्करराव जाधव,माजी.आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते देवून त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय चौगुले, माजी जि.प.सभापती प्रविण यादव, सुरज जमादार,सिराज जमादार,शब्बीर जमादार,शहिनाज जमादार,आयेशा जमादार,मिसबा जमादार,अवेज जमादार,शाहिन बारगीर,लैलाबी जमादार,अरिशा जमादार,अरहान बारगीर,शाहरीन बारगीर आदी उपस्थित होते.