Home कोल्हापूर जिल्हा पुलाची शिरोली : डोक्यात हातोडा घातलेल्या जखमी महिलेचा मृत्यू 

पुलाची शिरोली : डोक्यात हातोडा घातलेल्या जखमी महिलेचा मृत्यू 

पुलाची शिरोली : डोक्यात हातोडा घातलेल्य जखमी महिलेचा मृत्यू

 

कुंभोज/प्रतिनिधी (विनोद शिंगे):-डोक्यात हातोडा मारल्याने जखमी झालेल्या महिलेचा बुधवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सौ. मनिषा सागर कोळवणकर ( वय ३२, रा. कोरगांवकर काॅलनी, माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला जखमी करून आत्महत्या करत स्वतःलाही संपवणार असे म्हणत तीचा पती बेपत्ता आहे. सागर गोपाळ कोळवणकर ( वय ३५ ) असे त्याचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे काम आजही सुरू होते. त्याने शिये – कसबा बावडा मार्गावरील पंचगंगा नदी पुलावरून नदीत उडी घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,

सोमवारी दि. २ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मनिषा कोळवणकर या झोपेत असताना पती सागरने तिच्या डोक्यात हातोडा मारला. तीच्या ओरडण्यामुळे तीचा भाऊ नाना मोहिते हा जागा झाला. त्यावेळी मनिषा यांच्या डोक्यातून गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव सुरू होता.ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमीसोबत पती सागर यालाही दवाखान्यात नेण्यात आले. पती सागर कोळवणकर याने तेथून पळ काढला. त्याने आत्महत्या करणार असल्याचे एकाला सांगितले होते. दोन दिवस त्याचा शोध सुरू आहे. मात्र तो कोठेही मिळून आला नाही. पंचगंगा नदीवरील शिये – कसबा बावडा पुलावरून त्याने उडी घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोळवणकर कुटुंबीय मुळचे शेळोलीपैकी न्हाव्याची वाडी ( ता. भुदरगड ) येथील आहेत. दहा वर्षांपासून ते पुलाची शिरोली येथील कोरगांवकर काॅलनीत रहात आहेत. सागर व त्याची पत्नी मनिषा हे दोघेही शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला होते. त्यांना पंधरा वर्षाची एक मुलगी व तेरा वर्षाचा मुलगा आहे.

गुरुवारी सकाळी पंचगंगा नदीत बोटीच्या सहाय्याने सागरचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान बुधवारी गांधीनगर, इचलकरंजी पोलिसांच्या कडून त्यांच्या हद्दीत पंचगंगा नदीत मयत व्यक्तीची घटना नोंद आहे काय याची माहिती शिरोली पोलिसांनी दिली

 

 

…………………………………….