इचलकरंजी गणेशोत्सवावर राहणार पोलिसांची नजर -जिल्हापोलीस प्रमुख महिंद्र पंडित

    इचलकरंजी गणेशोत्सवावर राहणार पोलिसांची नजर -जिल्हापोलीस प्रमुख महिंद्र पंडित

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-गणेशोत्सव 2024 उत्सवाच्या अनुषंगाने मराठा सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी सौ. मौसमी चौगुले, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडीत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता बैठक संपन्न झाली.

     

    या प्रसंगी गणेशोत्सव काळात विघातक, विघ्नसंतोषी कृत्यांत सहभागी होणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तयार करून पोलिसांना देणाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तसेच ‘बंद सीसीटीव्हीसाठी १२ लाख देण्याचे जाहीर केले. यशोदा पुलाचे ५ सप्टेंबरला उद्घाटन करून आगमन व विसर्जन मार्ग मोकळा करणार असल्याचेही अशी घोषणा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केली सांगितले.*

     

    बैठकीसाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, उपायुक्त प्रसाद काटकर, अप्पर तहसिलदार पोलिस सुनील शेरखाने, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरीक्षण प्रविण खानापुरे, सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सोमनाथ आढाव, अतिरिक्त आयुक्त विजय कावळे यांच्यासह पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.