अंबप येथील शिवसेना गटाचा वडगाव महावितरण कार्यालयावर मोर्चा
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- अंबप परिसरातील अंबप अंबपवाडी मनपाडळे या गावांमध्ये घरगुती लाईट लोड शेडिंग बंद करणे संदर्भात शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे विद्युत महामंडळ पेठ वडगाव यांना निवेदन देण्यात आले. अंबप गावांमध्ये कावडे मळा, आंबेडकर नगर ,नागोबा मळा मनपाडळी सूर्यवंशी मळा, अंबपवाडी जाधव मळा येथे राहणाऱ्या नागरिकांचे सायंकाळी सुरू केलेले घरगुती लोड शेडिंग तात्काळ बंद करावी येथील नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा करावा, सध्या पावसाळ्याच्या दिवसामुळे मनपाडळे अंबप गावे वन क्षेत्राला लागत असून सदर गावांमध्ये जंगली प्राण्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच लोड शेडिंग मुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाणही मोठ्या मनात वाढले असून त्यासाठी घरगुती लाईट लोड शेडिंग बंद करावे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख सागर चोपडे ,संदीप चोपडे ,उत्तम माळी तसेच परिसरातील नागरिक व शिवसैनिकांच्या वतीने उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पेठ वडगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आले सदर निवेदनाची दखल न घेतल्यास परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर चोपडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे उप अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.