पेठ वडगावात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन
पेठवडगाव,(प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव यांच्या वतीने शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी सकाळी साडेदहा ते दूपारी चार वाजेपर्यंत लोक न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.
तरी या लोक अदालतीमध्ये नागरिकांनी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणे आपापसात व तडजोडणी मिठविण्याकरिता या लोकन्यायालयाचा लाभ घेऊन आपला वेळ व पैसा, परिश्रमाची बचत करावी, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एल.एम. पठाण यांनी केले आहे.