लाटवडे-भेंडवडे रस्त्यावर पुराचे पाणी

    लाटवडे-भेंडवडे रस्त्यावर पुराचे पाणी

     

     

     

     

    खोची,(भक्ती गायकवाड):-  खोची,भेंडवडे परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी मोठी वाढ झाली आहे.यामुळे खोची भेंडवडे मार्गे पेठ वडगावला जोडणाऱ्या रस्त्यावर भेंडवडे नजीक ओढ्यावरील पुलावर पाणी येऊन तसेच लाटवडे नजीक मंजनवलीसो पिराच्या दर्गा नजीक रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.खोची भेंडवडे येथील नागरिकांनी पर्यायी शरद साखर कारखाना मार्गे व सावर्डे नजीक भेंडवडे फाटीमार्गे वाहतूक सुरू केली आहे.