Home कोल्हापूर जिल्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश मजबूत होण्यासाठी राजर्षी छ.शाहूंच्या विचारांची गरज -बालेचाँद जमादार

गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश मजबूत होण्यासाठी राजर्षी छ.शाहूंच्या विचारांची गरज -बालेचाँद जमादार

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश मजबूत होण्यासाठी राजर्षी छ.शाहूंच्या विचारांची गरज -बालेचाँद जमादार

 

 

हेरले / (प्रतिनिधी):- गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश मजबूत होण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांची गरज आहे. कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम दिसतोय, तो छत्रपती शाहूंच्या सामाजिक कार्याने व विचारानेच झालेला आहे. असे मत संस्थेचे चेअरमन बालेचाँद जमादार यांनी शाहू जयंती निमित्त व्यक्त केले. ते हेरले येथील चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.

यावेळी संस्थेचे संचालक कुमार इंगळे, सुरेश पाटील, रामचंद्र निंबाळकर, जगदीश गडकरी, विठ्ठल शिंदे, सिंकदर खतीब, राजू खतीब, सुरेश चौगुले, सचिव संदीप कोळी आदी मान्यवरांसह सभासद उपस्थित होते.