महापुरुषांच्या शाळेत कर्मवीर भाऊराव अण्णांच्या शाळेचा समावेश करण्याची मागणी
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):- केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोज येथे शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर मॅडम शाळा भेटीसाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी महापुरुषांच्या शाळेत कर्मवीर अण्णांच्या शाळेचा समावेश संदर्भात शिक्षण विभागाने देखील सहकार्य केल्यास लढ्याला बळ येईल अशी मागणी केली. तसेच सदर मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुंभोज, समस्त कुंभोज ग्रामस्थ यांचे मार्फत पालकमंत्री हसन मुश्रीफ ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना प्रस्ताव दिल्याची माहिती दिली, जोपर्यंत कुंभोज शाळेचा समावेश महापुरुषांच्या शाळा यादीत करून जास्तीत जास्त निधी येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील असे शिक्षणाधिकारी मॅडम यांना सांगून आपणही स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करावा ही विनंती केली.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम म्हणाल्या, सदर मागणीचा प्रस्ताव आम्ही शिक्षण विभागाकडून राज्यशासनाकडे पाठवला आहे. महापुरुषांच्या शाळा विकास यादीत कुंभोज शाळेचा समावेश करून जास्तीत जास्त निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी शालेय प्रशासन विभाग देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले.त्यावेळी आदित्य पाटील, संदिप तोरस्कर, अमोल गावडे, राहुल कत्ते, विनायक पोतदार, अजित जाधव तसेच ग्रामसेवक, पत्रकार, सदर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व कुंभोज ग्रामस्थ उपस्थित होते.