विनायक भोसले यांना ‘एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान

    विनायक भोसले यांना ‘एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान

     

     

    कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे),अतिग्रे:- युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशन या दिल्ली स्थित संस्थेकडून, मुंबई येथे 15 जून रोजी झालेल्या 13 व्या एज्यु लीडर्स समिट आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना ‘एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    रॉक स्पोर्ट्स चे सह संस्थापक पियुष खंडेलवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार भोसले यांनी स्वीकारला.यावेळी असोसिएशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी,सह संस्थापक अशितोष दुबे उपस्थित होते.

    विश्वस्त विनायक भोसले यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. इंटरनॅशनल स्कूल, इन्स्टिट्यूट, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, आणि विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये त्यांनी विशेष श्रम घेतले आहेत. यावर्षी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा विषयक सर्व सेवा कशा मिळतील याकडे विशेष लक्ष त्यांनी दिले आहे. नवे अभ्यासक्रम व संशोधनासाठी प्रोत्साहन देऊन विद्यापीठास उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे यावर्षी देशातील 300 विद्यापीठांमधून एज्युकेशन वर्ल्ड संस्थेने घोडावत विद्यापीठाला देशात 31वे,राज्यात 5 वे तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 ले रँकिंग दिले आहे.

    पुरस्काराबद्दल बोलताना भोसले म्हणाले, की हा पुरस्कार केवळ माझा नसून चेअरमन संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आहे. तसेच संस्थेसाठी सातत्याने परिश्रम घेणारे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,प्राचार्य डॉ. विराट गिरी, प्राचार्या सस्मिता मोहंती, सर्व डीन, प्राध्यापक, शिक्षक,कर्मचारी यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

    पुरस्काराबद्दल संजय घोडावत यांनी विनायक भोसले यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.