समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना

    कोल्हापूर, : जिल्हा स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे व मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कक्षाची स्थापना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे नुकतीच करण्यात आली.
    या कक्षाचे उदघाटन फेस्कॉम कोल्हापूर प्रादेशिकचे अध्यक्ष सी.के.नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. वृध्दांसाठी असणाऱ्या सर्व योजना एकाच छत्राखाली आणून त्या योजनांचा लाभ संबंधित वृध्दांना देण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करून त्याव्दारे सनियंत्रणाचे कामकाज या कक्षाव्दारे होणार आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल लोंढे यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा डवर व आभारप्रदर्शन कल्पना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमोद फडणीस, दिलीप पठेकर, लता कदम, मंगल पाटील, अशोक जाधव, दत्तात्रय पाटील, निलम गायकवाड व सचिन कांबळे आदी उपस्थित होते.