कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १७.९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या निधीतून रस्ते, गटर्स व इतर कामे करण्यात येणार आहेत.
आ. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, विकासवाडी, नेर्ली, तामगांव, उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा, विमानतळ ते मणेरमळा रस्ता व आरसीसी गटर्स बांधणे व रुंदीकरणासह रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 50 लाख), कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता शाहू नाका, कळंबा, साळोखेनगर, बालिंगे शिंगणापूर, चिखली, वडणगे, निगवे दुमाला, शिये, टोप ते एमआयडीसी पूल, कसबा बावडा शुगरमिल जवळून कदमवाडी मार्केट यार्ड ताराराणी पुतळा ते शाहूनाका उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता सुधारणा करणे व आरसीसी गटर्स बांधणे (1 कोटी), विजयदूर्ग तलेरा गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत, उचगांव पूल ते मुडशिंगी कमान रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 50 लाख), कोल्हापूर कळंबे तर्फ ठाणे, इस्पुर्ली, शेळेवाडी रस्ता सुधारणा करणे, (5 कोटी), आयटीआय, पाचगांव, गिरगांव, वडगांव, नंदगांव, खेबवडे ते बाचणी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी), विकासवाडी, नेर्ली, तामगांव, उजळाईवाडी, विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा आरसीसी गटर्स बांधणे व रुंदीकरणासह रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 50 लाख), चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पूर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगांव, कोगील, कणेरी, नेर्ली, हलसवडे, पट्टणकोडोली, कोगील बु. गावाजवळ आरसीसी गटर्स बांधणे व काँक्रीटीकरण करणे (1कोटी), चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगांव, कोगील, कणेरी, गोकुळ शिरगांव, नेर्ली पट्टणकोडोली, मोरी बांधकाम व संरक्षक भिंत बांधकाम करणे (50 लाख), कात्यायनी मंदिर, दऱ्याचे वडगांव, सिध्दनेर्ली बंदीस्त गटर्स करणे (60 लाख) आदी कामे मंजूर झाली आहेत.
निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
वडगांव न्युज प्रतिनिधी सोमेश्वर मिरजे.