तुळजापूर येथील मयुर लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा

     

    तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेल्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी एका लॉजवर स्थानिक पोलिसांच्या कृपेने राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता. त्याची थेट तक्रार पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली होती.एसपींच्या आदेशानंतर या लॉजवर आज छापा मारण्यात आला आहे.
    लातूर रोडवरील मयुर लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला असता, वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
    लातूर रोडवरील या लॉजवर गेल्या अनेक दिवसापासून राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता, मात्र स्थानिक पोलीस त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होते. त्याची थेट तक्रार पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे करण्यात आली होती.
    एसपीच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही वेळापूर्वी या लॉजवर छापा मारला असता, त्यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले आहेत.
    या लॉज मालकाचे आणि स्थानिक पोलिसांचे साटेलोटे सुरु होते. महिन्याला चिरीमिरी सुरु होती. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप ‘ असे सुरु होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चक्क ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
    या सर्वावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    वडगांव न्यूज प्रतिनिधी- सिद्धांत चौधरी तुळजापूर.