इचलकरंजी सांगली रोडवर एका युवकाचा आढळला मृतदेह

     

     

    इचलकरंजी : सांगली रोडवरील पर्वती इंडस्ट्री समोरील संगम नगर येथे कोल्हापुरी धाब्या जवळ एका युवकाचा मृतदेह आढळला आहे.
    हा घातपात की अपघात यातून नेमेके कारण समजू शकले नाही.
    संगमनगर धाब्याजवळील मृत व्यक्तीचे नाव आमीन गलवाल असुन या युवकाला काल त्याच्या मित्रांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
    त्यामुळे घातपात झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
    घटनास्थळी मृत आमीन त्याच्या अंगावर मारलेल्या वन आहेत हा घातपात की अपघात हे अजून समजू शकले नाही.
    आमीन यांची पत्नी व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
    घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी डीवायएसपी बिबी महामुनी यांनी भेट दिली .