डी.वाय.पाटील कृषीच्या अविष्कार कोगनोळेची राहुरी कृषी विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

    डी.वाय.पाटील कृषीच्या अविष्कार कोगनोळेची

    राहुरी कृषी विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

     

    तळसंदे, (वार्ताहर):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे घेण्यात आलेल्या फुटबॉल संघ निवड चाचणीत डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या अविष्कार सुहास कोगनोळे या खेळाडूने चमकदार कामगिरी करत विद्यापीठ संघात स्थान मिळवले आहे.

    या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या 10 जिल्ह्यांमधील 45 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या अविष्कार कोगनोळे याने स्पर्धेसाठी गोलकीपर म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघामध्ये स्थान निश्चित केले आहे

    पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धा दिनांक 16 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा गुजरात येथे संपन्न होणार आहेत या स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

    महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

    संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त मा. आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडूचे व प्रशिक्षक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.