बी.वाय.कॉलेजचा कुस्तीपटू पृथ्वीराज मोहिते कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेत प्रथम
पेठवडगाव,(प्रतिनिधी) : पेठवडगाव येथील बळवंतराव यादव ज्युनि.कॉलेजचा कुस्तीपटू पृथ्वीराज माणिक मोहिते या खेळाडूने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
या खेळाडूची उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूला संस्थेचे अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव,सचिव विद्याताई पोळ,कार्यवाह अभिजीत गायकवाड ,प्राचार्य अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, उपप्राचार्य के. डी. कोळी यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच क्रीडा शिक्षिका अलका पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.