गणेश मुर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात, कारागिरांची लगबग

    गणेश मुर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात, कारागिरांची लगबग

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज तालुका हातकलंगले येथे गणेशोत्सवाच्या मूर्तींची रंगकाम व अन्य कामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस करून सर्व कामे चालू असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. उद्या सकाळी गणपतीचे आगमन होणार असून या अनुषंगाने कुंभोज परिसरात सर्वच कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात गणपती कामे शेवटच्या टप्प्यात मुती रंगवण्याची लगबग सुरू असलेलेचे दिसत असून बाजारपेठेत गणपती आगमनासाठी तसेच गौरीच्या आगमनासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी विक्रीसाठी मोठी लगबग आहे. परिणामी यावेच्या परिसरात पडलेल्या मोठ्या पावसाचे व झालेल्या नुकसानीचे परिणाम ही गणेश चतुर्थीवर झाल्याचे चित्र दिसत असून गणपतीच्या मूर्तींचे वाढलेले दर व बाजारपेठेत वाढलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सर्व गणेश चतुर्थीची सजावट अत्यंत साध्या पद्धतीने व स्वतः करणे पसंत केल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे.
    परिणामी गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा गणेशोत्सवाला यावर्षी राजकीय रंगत आली असून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असणारे सर्वच उमेदवार मोठ्या तरुण मंडळांना लागेल ते सहकार्य करत असल्याचे चित्र दिसत असून यावेळी तरुण मंडळांची चैनी असल्याचे चित्र दिसत आहे. बऱ्याचशा ठिकाणी अनेक राजकीय इच्छुक उमेदवारांच्या वतीने महाप्रसाद ,गणेश मूर्ती त्याचप्रमाणे विसर्जनासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची पूर्तता केली जात असल्याची ही माहिती मिळाली आहे. परिणामी येणारी विधानसभा ही आत्ताच्या गणेश उत्सवावरच ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून जोर धरत असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वच मंडळांना ताकत लावण्याचा प्रयत्न आपापल्या परीने चालू केला असल्याची माहिती मिळत आहे.