तेजस्विनी पाटील यांची शासनाच्या औषध निर्माण अधिकारी पदी निवड
टोप /(वार्ताहर) :-कोडोली ता.पन्हाळा येथील तेजस्विनी प्रदिप पाटील हिची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालय मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली.
तेजस्विनी पाटील हीचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर भादोले, माध्यमिक शिक्षण- वडगांव हायस्कूल वडगांव तर उच्च शिक्षण- अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी वडगांव येथे झाले, त्यांनी मानधन तत्त्वावर 7 वर्षे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल कोल्हापूर येथे फार्मसिस्ट म्हणून काम करत असतानाच आपण शासकीय सेवेत रुजू व्हायचं अशी मनाशी ठरविले होते.त्यानुसार पती प्रदीप पाटील व घरच्या सर्वांच्या सहकार्याने जिद्द चिकाटी ठेवून अभ्यास करून जून 2023 मध्ये वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचनालय मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमधून औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली. त्यांना , आई सुलोचनापाटील,वडील अशोक पाटील, सासू सौ कमल पाटील, सासरे भीमराव पाटील, दिर प्रशांत पाटील,यांचे मार्गदर्शन लाभले. तेजस्विनी पाटील हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.