शेंडूरे कॉलेजच्या मॅनेजमेंट सेक्रेटरी पदी राहुल आवाडे यांची निवड

    शेंडूरे कॉलेजच्या मॅनेजमेंट सेक्रेटरी पदी राहुल आवाडे यांची निवड

     

     

    हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई – शांताप्पा शेंडूरे या कॉलेजच्या महाविद्यालय विकास समितीच्या नामनिर्देशित मॅनेजमेंट सेक्रेटरी पदी मा. जिल्हा परिषद सदस्य मा. डॉ. राहुल आवाडे यांची निवड करण्यात आली याबद्दल महाविद्यालय विकास समितीने त्यांचे काॅलेज नियतकालिक कर्मरजत अंक व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच साहेबांच्या हस्ते महाविद्यालय सभागृहाच्या स्लॅब चे शुभारंभ आणि महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी साहेबांनी महाविद्यालय विकासासाठी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले.

    यावेळी मानसिंग आण्णा देसाई, शिवराज नाईक, अजित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले, राहुल इंग्रोळे, प्रा. एम. एस. मुजावर, डॉ. संध्या माने, प्रा. के.आय मुल्लाणी, प्रा. डी. सी. तुळशीकट्टी, सौ. माधुरी शिंदे, डॉ. विजय पाडळकर, उपस्थित होते.