कामधेनू दुध संस्थेच्या चेअरमनपदी रावसाहेब चौगुले तर व्हा.चेअरमनपदी पुजा चौगले यांची निवड
हेरले,(प्रतिनिधी):- हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू सह.दुध व्याव.संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत जयशिवराय आघाडीने सर्व 13 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.पी.दवडते यांनी काम पाहिले .
यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन रावसाहेब चौगुले यांची चेअरमनपदी तर पुजा चौगले यांची व्हा . चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी श्रीकांत सावंत , ॲड विजयकुमार चौगुले, सुनिल खारेपाटणे , मधुकर आकिवाटे , अविनाश पाटील , सतिश वाकरेकर , बबनराव चौगले , स्वप्नील चौगुले , यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी एन.पी. दवडते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ अमोल झांबरे, अनिल सावंत , प्रकाश चौगुले, भिमराव चौगुले , दगडू कदम , धोंडिराम काकडे, अमिरहमजा हजारी , विनोद शेटे, दत्तात्रय कांबळे , शिवाजी भेंडेकर , जयश्री चौगुले , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . आभार संस्थेचे सचिव रमेश लोंढे यांनी मानले.
.