सहकारातील अग्रणी असणाऱ्या पाराशर सोसायटीला मनाचा राष्ट्रीय पुरस्कार

    सहकारातील अग्रणी असणाऱ्या पाराशर सोसायटीला मनाचा राष्ट्रीय पुरस्कार

     

     

     

    नवे पारगाव,(प्रतिनिधी) : पारगाव(ता.हातकणंगले) येथील सहकारातील अग्रणी असणाऱ्या व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारणाला चालना देणारे श्री पाराशर विकास सेवा संस्थेचा ‘इंटिग्रेटेड सोशल वेलफेयर सोसायटी चि बेळगावी व नॅशनल रूरल डेवलपमेंट फाऊंडेशन बेळगावी’ तर्फे ‘राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था-२०२४’ पुरस्कारानी मान्यवरांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री विराप्पा मोईली,माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांच्या अखत्यारीतील नॅशनल रुरल डेवलपमेंट फाऊंडेशन बेळगांवी कर्नाटक तर्फे आयोजित कर्नाटक, दिल्ली,महाराष्ट्र,गुजरातसह गोवा आदी संयुक्त राष्ट्रीय पुरस्कार सन्मान सोहळा गोवा येथे संपन्न झाला.यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व प्रगतीपथावर असणारे विविध संस्था मध्ये पाराशर विकास सेवा संस्थेचा नॅशनल फाऊंडेशनच्या चेअरमन डॉ.सिमा इंग्रोळे,बिदर कर्नाटकचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेगण्णावर,गोवाचे आमदार रवी शेख,बेळगावीचे माजी खासदार व बॅरिस्टर अमरसिंह पाटील आदी मान्यवरांचे हस्ते ‘राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था पुरस्कारानी पाराशर विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, उपाध्यक्ष अनिल पाटील व संचालक मंडळास राष्ट्रीय सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.पारगाव सारख्या ग्रामीण परीसरातील पाराशरला मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारानी संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, त्यामुळे जिल्हा व परीसरातुन संस्थेवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.