इंटरनॅशनल स्कुलचा रोनीत नायक देशात पहीला 

     

    वडगांव : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत डाँ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुल पेठ वडगांव अंतर्गत आर्मड फोर्सेस प्रोपरेटरी इन्स्टिट्युटचा कँडेट रोनीत रंजन नायक याने केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा २०२०एन डि ए (१४५वी तुकडी) मध्ये सर्वाधिक गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर कँडेट पंकेश मोठाभाऊ महाले देशात (१२) कँडेट गौरव मोहन नाथ (८९) कँडेट चंदन पुंडलिक हरले (११५) कँडेट पवन सोमेश्वर निर्मल (१७५) या विद्यार्थ्यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोग एन. डि. ए. परिक्षेत नेत्रदिपक यशाने पुनावाला स्कुलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे .जिद्द ,चिकाटी, तिव्र इच्छाशक्ती ,आथक परिश्रमाची तयारी,मनाची एकाग्रता , अभ्यासात सातत्य, अफाट ध्येयशक्ती ह्या गोष्टीतून यश प्राप्त करता येत हे पुनावाला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले .
    यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव , संस्थेच्या सचिवा सौ.विद्या पोळ यांची प्रेरणा मिळाली तसेच स्कुलचे संचालक डाँ.सरदार जाधव, प्राचार्य मारुती कामत, ए.एफ.पी.आय.चे चेअरमन श्री, विस्वास कदम, संचालक मेजर कुलथेन चंद्रसेन ,आई वडील यांचेसह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. डाँ.पुनावाला इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या नेत्रदिपक यशामुळे स्कुल व विद्यार्थी ,शिक्षक यांचे विविध स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.